बिर्ला ए1 ओरिएंटग्रीन सिमेंट ही काळाची गरज आहे. कमीत कमी उर्जा आणि किमान नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करुन त्याची निर्मिती जबाबदारीने करण्यात आलेली आहे. अश्याप्रकारे पर्यावरणपूरक असल्याने आपल्या पृथ्वीच्या संवर्धनासाठी ते महत्वाची कामगिरी बजावत आहे.
ओरिएंटग्रीन सिमेंटला ‘ग्रीनप्रो’ हे प्रमाणपत्र कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) - ग्रीन प्रॉडक्ट्स ऍन्ड सर्व्हिसेस कौन्सिल यांनी प्रदान केलेले आहे. याचा अर्थ असा की ओरिएंटग्रीनचा पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी आहे आणि पर्यावरणपूरक इमारती आणि पर्यावरणपूरक कंपनीजची कामगिरी सुधारण्यामध्ये लक्षणीय योगदान देते. याच्या परिमाणामुळे नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन करण्यास मदत होते आणि जगण्यास अंतर्गत आणि बाह्य असे दोन्ही प्रकारचे अधिक उत्तम पर्यावरण देऊ करते.
हे प्रदीर्घ काळासाठी स्ट्रेन्ग्थ गेनही देऊ करते आणि बांधकामामधे गळती होणार नाही याची खात्री करते.
ओरिएंटग्रीन सिमेंटमधे गोलाकृती पार्टीकल्स असतात आणि त्यांची फाईननेस व्हॅल्यू ही अधिक असते. अश्या या गोलाकृती आकारामुळे, कॉन्क्रीट अधिक मुक्तपणे हालचाल करते आणि पार्टीकल्सच्या अधिक फाईननेसमूळे काँक्रेटची छिद्रे अधिक उत्तमपणे भरली जातात यामुळे अधिक उत्तम कोहीसिव्नेस लाभते. तसेच ओरिएंटग्रीन सिमेंट हे ओपीसीच्या वापराने निर्मित कॉन्क्रीटच्या तुलनेत, विशेषतः उष्ण प्रदेशामधे, कॉन्क्रीटचा स्लंप लॉसचा दरही कमी करते.
ओरिएंटग्रीन सिमेंट हे कॉन्क्रीटचा सेटींग टाईम वाढवते त्यामुळे बांधकाम मिस्त्रीना कॉन्क्रीट किंवा सिमेंट मॉर्टरला मुलायम करण्यास मदत होते. कॉन्क्रीट मिक्सच्या या कोहीसिव्नेसमूळे कॉन्क्रीट मुलायम होण्यास योगदान लाभते.
ब्लिडींग हा विभक्तीकरणाचा एक प्रकार असतो, ज्यामधे कॉन्क्रीट मिक्समधील काही प्रमाणातील पाणी फ्रेश कॉन्क्रीटच्या पृष्ठभागापर्यंत वाढण्याकडे कल निर्माण होतो या ब्लिडींगमुळे, वरील पृष्ठभाग हा अगदी ओला होतो आणि कॉन्क्रीट सच्छीद्र, अशक्त होऊन त्याच्या टिकाऊपणावरही दुष्परिणाम होतो. निर्धारित कार्यशीलतेसाठी अधिक व्हॉल्यूम आणि कमी पाणी देऊन ओरिएंटग्रीन सिमेंट हे ब्लिडींग कमी करते यामुळे ब्लिड वॉटर चॅनल्सना रोखण्यासही मदत होते.
ओरिएंटग्रीनच्या वापराने निर्मित कॉन्क्रीटचे 28व्या दिवशीची ताकद आणि रेट ऑफ स्ट्रेन्ग्थ गेन ऑर्डीनरी कॉन्क्रीटसारखाच असेल. ओरिएंटग्रीनची सिलिकेटची निर्मिती हायड्रेशन रेट कमी झाल्यानंतरही चालू असते. याच्या परिणामस्वरुप स्ट्रेन्ग्थ गेन नंतरच्या कालावधीतही वाढते. स्ट्रेन्ग्थ गेनचा हा उच्च दर नंतरही चालू असतो आणि त्यामुळे नंतरच्या कालावधीत ताकदीचा दरही वाढतो.
कॉन्क्रीटचा स्टीलशी जोडला जाण्याचा बॉन्ड हा कॉन्क्रीटशी स्टीलच्या असलेल्या संपर्क क्षेत्र, कॉन्क्रीटच्या रिइन्फोर्समेंटची सखोलता आणि घनता यावर अवलंबून असतो. ओरिएंटग्रीन हे स्वभावतः अधिक मुलायम असल्याने पेस्ट व्हॉल्युम वाढवते आणि ब्लिडींग कमी करते. अश्याप्रकारे, संपर्क क्षेत्र वाढवले जाऊन स्टीलशी अधिक उत्तम बॉन्ड निर्माण होतो.
ओरिएंटग्रीनचे हायड्रेशन हे सर्वसाधारण सिमेंटमधील हायड्रेशनच्या तुलनेत अधिक संथ प्रमाणात असते, त्यामुळे उष्णता संथ प्रमाणात आणि कॉन्क्रीटमधील अंतर्गत स्ट्रेससही कमी प्रमाणात निर्माण होतात. अश्याप्रकारे, धरणे, रिटेनिंग वॉल्स, मोठे फाऊंडेशन्स इ. सारख्या भव्य प्रमाणातील कॉन्क्रीटींगसाठी ओरिएंटग्रीन हे आदर्श सिमेट बनते.
कॉन्क्रीटमधील ओरिएंटग्रीनमुळे ड्रायिंग श्रींकेज आणि प्लास्टीक श्रींकेजला कमी करण्यास मदत होते. कॉन्क्रीटमधील अंतर्गत लो स्ट्रेसेस आणि संथपणे उष्णता निर्माण होण्यामुळे ड्रायिंग श्रींकेज कमी होते. प्लास्टीक श्रिंकेजही लक्षणीय प्रमाणात कमी होते कारण निर्धारित स्लंपला कॉन्क्रीट कमी ब्लिड होते यामुळे कॉन्क्रीट चिरा-विरोधी होते.
जर कॉन्क्रीटमधे रिकाम्या जागा असतील तर त्यामधून द्रवपदार्थ झिरपू शकतात. ओरिएंटग्रीन कॉन्क्रीटमधे, आरंभीच्या हायड्रेशनमधे मुक्त होणारा लाईम [Ca (OH)2] हा रिऍक्टीव्ह सिलिकांकडून शोषला जातो आणि त्यामुळे कॉन्क्रीटच्या पृष्ठभागावर राहण्याऐवजी सिमेंटसारखे एक न विरघळणारे कंपाऊंड निर्माण होते यामुळे रिकाम्या जागा कमी होऊन कॅपिलरी मार्गही रोखले जातात आणि परिणामस्वरुप कॉन्क्रीटमधून इतर द्रव झिरपला जाण्याची शक्यताही कमी होते, त्यामुळे कॉन्क्रीटचा टिकाऊपणाही वाढण्यास मदतच होते.
रासायनिक हल्ल्यांना आणि स्टीलच्या गंजण्याला ओरिएंटग्रीन अधिक प्रतिकार करते. तसेच ते श्रींकेज आणि थर्मल क्रॅक्स यांची शक्यताही कमी करते, त्यामुळे बांधकामाचे आयुष्य वाढण्यास मदत होते आणि देखभाल खर्च कमी होतो.
‘कॉन्क्रीट एक्सपर्ट’ही आमच्या ग्राहकांसाठी असलेली एक अद्वितीय सेवा आहे. आमची अत्यंत अनुभवी तांत्रिक-मार्केटींग टिम थेट तुमच्या दारात ओरिएंटग्रीन सिमेंटच्या उत्कृष्ट दर्जाचे प्रदर्शन देईल आणि त्याबाबतचे मार्गदर्शन देतील आणि तुम्हाला पुन्हा आश्वासक करतील. आमच्या काँक्रेट एक्स्पर्ट मोबाईल व्हॅन ह्या अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहेत जे अनेक प्रकारे सिमेंटच्या दर्जाची चाचणी घेऊ शकते आणि आमच्या तज्ञांद्वारे आपल्या दारी तांत्रिक सेवा देण्यासाठी सज्ज आहेत.