
फक्त सर्वोत्कृष्ठतेचे वचन
बिरला A1 प्रिमियम सिमेंटचे उत्पादन ओरियेन्ट सिमेंटद्वारे केले जाते ही कंपनी भारतातल्या आघाडीच्या सिमेंट कंपन्यांपैकी एक आहे.
आपल्या स्वप्नाच्या घराला उत्तम मजबूती आणि टिकाऊपणा देण्यासाठी बिरला A1 प्रिमियम सिमेंटवर अनेक कठोर दर्जा परिक्षणे केली जातात.
पीएसटीचे फायदे मिळवा
बिरला A1 प्रिमियम सिमेंटचे उत्पादन नवीन प्रेशर सस्टेनिंग तंत्राच्या (पीएसटी) मदतीने होत असल्याने यातील कणांच्या आकाराच्या एकसमान वितरणाची खात्री मिळते. बिरला A1 प्रिमियम सिमेंटच्या मदतीने तयार केलेले कॉंक्रीट उत्तम कॉम्प्रेसिव शक्तिसोबत जास्त प्रेशर घेण्यात सक्षम आहे. हे आपल्या स्वप्नाच्या घराचे संरक्षण करुन त्याला जास्त आयुष्यमान देते.
बिरला A1 प्रिमियम सिमेंटउत्पादन पोर्टफोलियो
बिरला A1 प्रिमियम सिमेंटपोर्टलैन्ड पोझोलाना सिमेंट (पीपीसी) आणि सामान्य पोर्टलैन्ड सिमेंट (ओपीसी) या प्रकारात उपलब्ध आहे.
-
बिरला ए1
स्ट्राँगक्रीट -
बिरला A1
ओरिएंटग्रीन -
बिरला A1 प्रिमियम सिमेंट – पीपीसी
-
बिरला A1 प्रिमियम सिमेंट - OPC 53 ग्रेड
-
बिरला A1 प्रिमियम सिमेंट- ओपीसी 43 ग्रेड
वाढते तापमान आणि कार्बन फूटप्रिंट्स यामुळे याआधी कधी नव्हे, एवढा ताण आपल्या पृथ्वीवर पडलेला आहे. परंतु, ओरिएंट सिमेंटमधे, आम्ही असा ठाम विश्वास बाळगतो की आमच्यातील प्रत्येकजण ह्या परिस्थितीमध्ये बदल घडविण्यासाठी जबाबदार आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित आणि टिकाऊ पर्यावरणव्यवस्था उभारणे आणि आमच्या ग्राहकांसाठी उत्कृष्ट आणि पर्यावरणपूरक उत्पादने पुरविणे या आमच्या स्वप्नानुसार, आपल्या संपूर्ण आयुष्यात पर्यावरणपूरक असेल असे एक विशेष बिर्ला.A1 ओरिएंटग्रीन सिमेंट बाजारात आणताना आम्हाला अभिमान वाटतो आहे.
-
प्रमुख वैशिष्ट्य
- गंजविरोधी - आरसीसी कामामधील कॅपिलरी छीद्रांची संख्या आणि आकार कमी करुन ओरिएंटग्रीन हे कॉन्क्रीटचा दर्जा वाढवते. यामुळे कॉन्क्रीट मॅट्रीक्सची डेन्सीटी वाढते आणि परिणामस्वरुप ज्यामुळे कॉन्क्रीटच्या आतमधील स्टीलवर गंजाला कारणीभूत असलेल्या अत्यंत सूक्ष्म अश्या चिरांमधून कॉन्क्रीटमधील क्लोराईड्स किंवा CO2च्या वहनाला अडथळा निर्माण करते. ओरिएंटग्रीन कॉन्क्रीटमधील आवश्यक तो pH राखते, ज्यामूळे बांधकामामध्ये असलेल्या स्टीलला गंज लागण्यास प्रतिबंध निर्माण होतो.
- पाण्याची कमी गरज - मॉर्टर आणि कॉन्क्रीट मिक्स तयार करण्यासाठी ओरिएंटग्रीनला पाण्याची आवश्यकता कमी असते. यामुळे कॉन्क्रीटमधील कमी सच्छीद्रतेचा लाभ होतो. त्यामुळे बांधकामातील गळती याला अडथळा निर्माण होऊन उत्तम घनतेचे आणि अभेद्य कॉन्क्रीट तयार होते. इतर महत्वाच्या ब्रॅन्ड्सच्या तुलनेत ओरिएंटग्रीनचे नॉर्मल कन्सिस्टन्सीचे परिणाम कमी प्रमाणात आहेत.
- जलविरोधी आणि टेम्परप्रूफ - जलविरोधी आणि टेम्परप्रूफ एलपीपी पॅकेजिंगमुळे कोणतीही गळती किंवा भेसळ होणार नाही याची खात्री होते जे की सिमेंट सुरक्षित राहण्यास मदत करते. बॅगेची हाताळणी होत असताना कोणत्याही हुक्सचा वापर होत नसल्याने सिमेंट ताजे रहाते आणि लॅमिनेटेड पॅकेजिंगमुळे पावसाळी वातावरणातदेखील कमी प्रमाणात आर्द्रता बॅगेमधे शिरकाव करण्याची खात्री होते यामुळे सिमेंटचे आयुष्यही वाढते.
- उत्कृष्ट सामर्थ्य - उत्तम दर्जाच्या पोर्टलॅन्ड सिमेंट क्लिंकर्स आणि उच्च शुद्धतेच्या जिप्सम तसेच अतिशय रिऍक्टीव्ह असलेल्या मिनरल ऍडमिक्श्चर्सचा वापर करून तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक प्लॅन्ट्समधे ओरिएंटग्रीन सिमेंट उत्पादन केले जाते. अश्या या उत्कृष्ट दर्जाच्या साहित्याच्या वापरामुळे उत्तम सामर्थ्य आणि प्रदीर्घ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन्ग्थ मिळण्यास मदत होते आणि त्यामुळे मजबूत आणि अधिक घनतायुक्त बांधकाम निर्मिती होते.
बिरला ए1 स्ट्राँगक्रीट हे पाया, बिम्स, कॉलम्स आणि स्लॅब्स यासारख्या काँक्रिटच्या उपयोगासाठी खास अभियांत्रिकी कौशल्याने बनविलेले सिमेंट आहे. घराचे लोड-बेअरिंग काँक्रिट बांधकाम हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो आणि त्यामुळे त्यासाठी खास प्रकारच्या सिमेंटची गरज असते जे अतिशय उच्च दाब सहन करू शकेल आणि कटोर हवामानाच्या परिस्थितीला तोंड देऊ शकेल. ऑप्टिमिक्स18™ च्या शक्तीसह बिरला ए1 स्ट्राँगक्रीट केवळ तुमचे घर जलद आणि मजबूत बांधण्यास सहाय्य करते असे नाही तर ते अनेक वर्ष टिकेल याची देखील काळजी घेते.
-
प्रमुख वैशिष्ट्ये
-
ऑप्टिमिक्स18™
बिरला ए1 स्ट्राँगक्रीट मध्ये तीन प्रमुख घटकांचा समावेश करून ते अधिक मजबूत बनविण्यात आले आहे ज्यात मुलायमपणा, कणांचे वितरण आणि त्यात मिसळल्या जाणार्या पदार्थांचे प्रमाण यांचा समावेश आहे. -
हायड्रेशनची कमी उष्णता
हायड्रेशनच्या वेळी बिरला ए1 स्ट्राँगक्रीट मधून कमी प्रमाणात उष्णता बाहेर पडते त्यामुळे जाड काँक्रिटच्या भागात थर्मल क्रॅकिंगची जोखीम कमी होते. -
डबल कॅल्शियम-सिलिकेट-हायड्रेट जेल
अशा प्रकारे जेल तयार होण्यामुळे काँक्रिट दाट बनते आणि व्हॉईड-फ्री बनते त्याचप्रमाणे निसर्गाच्या हानिकारक परिणामांपासून रिबार्सचे रक्षण केले जाते, व अशा प्रकारे गंज लागण्यास प्रतिबंध केला जातो.
-
ऑप्टिमिक्स18™
-
प्रमुख फायदे
-
उच्च क्षमता
बिरला ए1 स्ट्राँगक्रीट मुळे नेहमीच्या सिमेंटच्या तुलनेत लवकर उच्च क्षमता असलेले काँक्रिट तयार होते. त्यामुळे कास्टिंगनंतर सुरूवातीच्या 28 दिवसांच्या कालावधीत त्याचे डिझाईन केलेले सर्वसमावेशक सामर्थ्य प्राप्त होते आणि त्यानंतर देखील सामर्थ्य प्राप्त होणे सुरू राहते. -
जलद सेटिंग वेळ
बिरला ए1 स्ट्राँगक्रीट त्याच्या जलद सेटिंगमुळे काँक्रिटचे नंतरचे स्तर लवकर टाकता येतात आणि त्यामुळे स्कॅफोल्डिंग किंवा फॉर्मवर्क सुरक्षितपणे आणि चटकन काढता येते. -
अधिक टिकाऊपणा
बिरला ए1 स्ट्राँगक्रीट थर्मल क्रॅक्स सारखे बांधकामाला नुकसान पोहोचण्यापासून रक्षण करते. ते गंज प्रतिबंधासारखे काम करते, आणि रिबार्सचे गंजपासून रक्षण करते.
-
उच्च क्षमता

बिरला A1 प्रिमियम सिमेंटचे निर्माण क्लिंकर, जिप्सम आणि खूप प्रतिक्रियात्मक फ्लाय ऍश यांच्या इंटर-ग्राइंडिंगने केले जाते. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कणांचे एकसमान वितरण ज्यामुळे उत्तम शक्ति मिळते आणि उत्तम घनत्व आणि कमी भंगुरता मिळते व कॉंक्रीट उत्तम आणि टिकाऊ बनते. हा किमान 53 एमपीए कम्प्रेसिव शक्ती 28 दिवसांच्या सांभाळानंतर मिळते.
-
प्रमुख वैशिष्ट्य
- उच्च मजबूती असल्यामुळे तीव्र वातावरणात उदा. क्लोराईड व सल्फेटच्या आक्रमणाच्या स्थितीत संरचनेला अधिक चांगला प्रतिरोध मिळतो. त्याच बरोबर बिरला A1 पासून तयार केलेले कॉंक्रीट कालपरवे जास्त शक्तिवान बनते.
- उत्तम फिनिश आणि गळतीला उच्च प्रतिरोध
- लो हीट ऑफ हायड्रेशन मुळे भेगा पडण्यापासून उत्तम प्रतिरोध
- कमीत कमी सिमेंट वाया जाते
- उत्तम अर्थकारण
-
विविध उपयोग
- औद्योगिक, निवासी आणि व्यावसायिक निर्माण
- बृहद कांक्रीट बांधकामाची धरणे, कालवे, रस्ते, ड्रेन्स इत्यादी.
- इमारतीचे निर्माण आणि आरसीसी काम
- पप्लास्टरिंग आणि गवंडी काम आणि मॉर्टर्स
- एफ्ल्युएन्ट आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
- समुद्री कार्य आणि किनारपट्टीवरील निर्माण

भारतात 53 ग्रेड सिमेंटच्या अग्रणींपैकी एक असलेल्या ओरियेन्ट सिमेंटमार्फत इमारतीच्या निर्माणामध्ये ओरियेन्ट गोल्ड 53 ग्रेडच्या परिचयासोबत 1992वर्षात एक नवीन दिशा खुली करुन देण्यात आली. ओरियेन्ट गोल्डचे यश आमच्याकडून ग्राहकांना उत्तमोत्तम उत्पादन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे प्रतिफळ आहे. हा ब्रॅंड आता आमच्या अंब्रेला ब्रॅंडच्या अंतर्गत एकीकृत झाला असून बिरला A1 प्रिमियम सिमेंट OPC53 ग्रेडच्या स्वरुपात नव्या नावाने सादर करण्यात आला आहे. यात 28 दिवसांच्या क्युअरींगने 53 एमपीए पर्यन्त कॉम्प्रेसिव शक्ती मिळवता येते.
-
प्रमुख वैशिष्ट्य
- उच्च कॉम्प्रेसिव शक्ती मिळवण्यासाठी उत्तम दर्जाची सामुग्री सामान आणि सुयोग्य प्रक्रिया नियंत्रणाची गरज असते.
- हे पारंपरिक ग्रेडच्या तुलनेत जास्त लवकर दृढ स्वरुपात येत असून निर्माणाचा दर्जा वाढ़वते.
- यामुळे आर्थिक दृष्टया निर्माण कमी खर्चात होते, कारण आरंभाच्या उच्च दृढतेमुळे सिमेंटचा वापर आणि बांधकामासाठी लागणारा वेळ दोघांची बचत होते.
- निरंतरता आणि सिमेंटच्या उत्कृष्ठतेमुळे अजोड टिकाऊपणा मिळतो

याचे मूळ नांव ओरियेन्ट 43 ग्रेड सिमेंट असून हे ओरियेन्ट सिमेंटचे सर्वात यशस्वी उत्पादन आहे, या उत्पादनाने इतरांना अनुसरणाचा मार्ग दाखवून दिला आहे. नियंत्रित निर्माण प्रक्रिया स्थितींच्या अंतर्गत याचे उत्पादन उच्च दर्ज्याचा प्लॅंट आणि मशीनरीचा वापर करुन केले केले जाते आणि यामुळे कमी वेळात याला उत्तम प्रसिध्दी मिळाली आहे आणि आज ओरियेन्ट सिमेंट हे नाव घरोघरी पोचले आहे. यात 28 दिवसांच्या क्युअरींगने 43 एमपीए पर्यन्त कॉम्प्रेसिव शक्ती मिळते.
-
प्रमुख वैशिष्ट्य
- सामान्य प्रकारच्या सिमेंटचा वापर प्री कास्ट, प्री स्ट्रेस्ड आरसीसी निर्मितीसाठी होतो.
- ऍस्बेस्टॉस/ नॉन ऍस्बेस्टॉसआधारित शीट्स, पाईप्स आणि उत्पादानांसाठी उपयोगी असते
- सामान्य सिविल इंजिनियरींग कामांसाठी उपयुक्त उदा. इमारत, पुल, रस्ता इ..
- सर्वसामान्य बीआआयएस मानकांपेक्षा उच्च कॉम्प्रेसिव स्ट्रेन्थ.