
आपले स्वप्नाचे घर अनेक पिढ्यांपर्यंत चालले पाहिजे
उत्तम गुणवत्तेचे सिमेंट वापरा
सिमेंट सर्वात महत्वाचा कच्चा माल असून निर्माण खर्चात याचा समावेश अन्दाजे 15% असतो. सिमेंटतुमच्या पायाच्या, भिंतीच्या व छताच्या निर्माणात वापरल्या जाणा-या रेती आणि दगड यांना बांधणा-या एजंटचे महत्वपूर्ण काम करतो त्यामुळे आपण सिमेंट्चा ब्रॅंड ब्रान्ड विचारपूर्वक निवडला पाहिजे. सिमेंटचा दर्जा जेवढा उत्तम असेल, तेवढ़ीच आपल्या स्वप्नातल्या घराचे आयुष्यमान जास्त असेल.
या विभागात आम्ही आपल्या काही प्राथमिक प्रश्नांची उत्तरे देणार जे आपल्या मनात घराचे बांधकाम सुर करताना येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही उत्तम विकल्प निवडू शकाल. आमच्याकडे घराचे बांधकाम, या विषयाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे अनेक लेख सुद्धा उपलब्ध आहेत.
-
घराच्या बांधकामासाठी कशा प्रकारचे सिमेंट वापरावे?
सिमेंटचे दोन प्रामुख्याने वापरले जाणारे प्रकार आहेत जे निर्माणसंबंधी उपयोगात येतात ते म्हणजे सामान्य पोटलैन्ड सीमेन्ट (ओपीसी) आणि पोर्टलैन्ड पोज्झोलाना सीमेन्ट (पीपीसी).
तरीही पीपीसी सिमेंट घराच्या निर्मितीसाठी जास्त उत्तम असून विशेषत: पाया, कॉलम्स, बीम्स व स्लॅबसारख्या महत्वपूर्ण ऍप्लिकेशनसाठी साजेसे आहे.
-
बिरला A1 प्रिमियम सिमेंट माझ्या घराच्या निर्माण कामासाठी उत्तम का आहे?
कॉंक्रीटवर रसायन आणि पाण्याचा प्रभाव होण्याची शक्यता असते.संरचनेला मजबूत करण्यासाठी वापरलेल्या स्टील बार्सचे क्लोराईड्स क्षरण करु शकतात तर सल्फेट्स थेट कॉंक्रीटवर हल्ला करता त्यामुळे कालांतराने ते गंजते, त्यात भेगा पडतात व ते गळू लागते. पण बिरला A1 प्रिमियम सिमेंटमध्ये सीमेन्टमध्ये प्रकिया केलेली फ्लाय एश आणि रिएक्टिव सिलिका असतात जे एक सुरक्षात्मक जेल तयार करतात. बिरला A1 प्रिमियम सिमेंटपासून तयार केलेले कॉंक्रीट यामुळेच गंज लागणे आणि सल्फेटमुळे होणा-या नुकसानाला प्रतिरोध करते.
-
मी सिमेंटच्या दर्जाची खात्री कशी करणार?
तुम्ही सिमेंटच्या दर्जाचे परीक्षण खालील प्रकारे करु शकता:
- बॅग उघडा आणि दुरुनच सिमेंटला नीट बघा. त्यात गाठी नसल्या पाहिजेत. सिमेंटचा रंग हिरवट भूरा असला पाहिजे.
- आपला हात सिमेंटच्या बॅगमध्ये घाला. ते थंड लागले पाहिजे आणि त्यात कसल्याही गाठी नसल्या पाहिजेत.
- थोड़ेसे सिमेंट आपल्या हातात घ्या आणि बोटांवरुन फिरवा. ते एकदम बारीक असले पाहिजे आणि ते बोटांना बोचता कामा नये
- हातात मूठभर सिमेंट घ्या आणि पाणी भरलेल्या बादलीत टाका, त्याचे कण काही काळ पाण्यात तरंगले पाहिजे आणि मग खाली बसले पाहिजे.
निर्माण संबंधीत विविध सामुग्री आणि टप्पे कोणते आहेत?- उत्खनन
- फाउंडेशन
- कॉलम, बीम आणि स्लॅब
- विटांचे काम
- प्लास्टरिंग
- फिनिशिंग