
वेळेवर दुरुस्ती करुन
त्यांना पुढच्या पिढ़्यांपर्यन्त टिकाऊ बनवा
आपल्या स्वत:च्या घरात आनंदाने राहाण्यासारखे सुख कुठेच नाहीये. आपल्याला ते बांधताना जे कष्ट होतात, ते खरच सार्थकी ठरतात. काही स्वयंप्रेरित टप्प्यांपासून मिळालेल्या मदतीच्या सहाय्याने तुम्ही तुमचे घर आज सारखे नेहमीच सुंदर दिसेल हे सुनिश्चित करु शकता. निवारणात्मक देखभाल मोठ्या दुरुस्तीपेक्षा नक्कीच कमी खर्चीक असते.
आपले कुटुंब आणि भाग्य जसजसे प्रगती करते तशी आपल्याला नेहेमीच जास्तीची खोली किंवा मजला असण्याची गरज वाटते.
या विभागात आम्ही तुम्हाला निवारणात्मक देखभालीविषयी आणि आपल्याला घरात कशा प्रकारे खोली किंवा मजला वाढ़वता येईल याच्या काही उपयोगी टिप्स देणार आहोत.
-
भेगा आणि गळणे कसे थांबवावे?
बांधकामाच्या वेळी पुरेश्या क्युअरींगचा योग्य कालावधी भेगा कमी करतो. तरीही, कालानुक्रमे भेगा आणि गळणे, हा प्रकार होतोच. भेगा लहान असल्यास त्यांच्यात पेन्ट आणि टच अप करुन सुधारणा करता येते. भेगा जास्त असल्यास कुशल गवंडी कामाची गरज असते उदा. स्टेपलिंग, गन्टिंग किंगा ग्राउटिंग, आणि हा प्रकार क्षति कशा प्रकारची आहे यावर अवलंबून असतो. अशाप्रकारचे काम करण्याआधी एखाद्या जाणकार व्यक्तिकडून सल्ला घेणे कधीही उत्तम.
-
भिंती आणि छतावर पुन्हा सिमेंटिंग करण्यासाठी कोणते सिमेंट उत्तम आहे?
पुन्हा सिमेंटिंग करण्यासाठी भिंती आणि छतासाठी पीपीसी सर्वात उत्तम आहे कारण यात उच्च कंप्रेसिव्ह शक्ती आहे.